•विदयार्थी,पालकांचा पं.स.मध्ये ठिय्या.
माणिक कांबळे /मारेगाव :- शाळेला शिक्षक मिळावा या प्रमुख मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळा सुधार समितीच्या वतीने मारेगाव पंचायत समिती मध्ये सोमवारला ठिय्या देण्यात आला.30जूनला शाळेची घंटा वाजली पहिल्याच दिवशी शाळेत किलबिलाट सुरु झाला असताना मात्र वर्गवारीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शिक्षकांची उणीव सतावत होती.आपल्या पाल्याची अडचण भविष्य घडवीण्यास बाधा ठरण्याची भीती निर्माण झाली असल्याने देवाळा येथील पालकानी आमच्या शाळेला शिक्षक मिळेल काहो ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी मारेगाव पंचायत समिती मध्ये ठिय्या दिला.तर वरुड येथील पालकांनी पंचायत समिती मध्ये शाळा भरवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
30.जून पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे.मात्र मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अनेक शाळा मध्ये शिक्षकांचा अभाव आहे.त्यामुळे स्थानिक शाळा सुधार समिती कडून जन आंदोलन उभे करण्यात आले आहे.तालुक्यातील 11 गावात एकही शिक्षक नाही तर अनेक गावात एकाच शिक्षकाच्या भरवशावर सम्पूर्ण शाळेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.1 ते 7-8वर्ग असलेल्या शाळांना 40 वर पटसंख्या असलेल्या शाळेला एकच शिक्षक असल्यामुळे वर्ग संभायळाचा कसा? असा पेच निर्माण झाला आहे. शिकवणी मध्ये किती तास कोणत्या वर्गाला द्यावे नियोजनातं अडचणी येत आहे.तसेच शिकवणीच्या तासात इतर वर्ग मोकाट असल्यामुळे वर्गातील विदयार्थी शिकण्या ऐवजी गडबडी करताना दिसत आहे.त्यामुळे शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांचा मोर्चा पंचायत समिती कडे गर्दी करताना दिसत आहे.
ठिय्या आंदोलनात देवाळा येथील उपसरपंच सुरेश लांडे, लता रामटेके,विजय औताडे, ज्योती सिडाम, भा.पा.निखाडे,अ.ता.बोकडे, म.मा.गाणफडे या सह अनेकांच्या सहया आहेत तर वरुड येथील शाळा सुधार समितीच्या वतीने आयोजित शाळा भरो आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास भट,उपाध्यक्ष आशा खामणकर,सदस्य नीलिमा झट्टे,विनोद काकडे,ज्ञाणेश्वर जगताप,सीमा पवार,महादेव नागोसे,अशोक नावडे,सारिका निपूंगे,इत्यादीचा सहभाग होता.