•मंदर येथील घटना.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मंदर येथे 25 वर्षीय अविवाहित तरुणाने बेडरूममध्ये पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश प्रकाश पेंदाने ( २५ वर्ष ) रा.मंदर ता.वणी,जि. यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे.
हि घटना काल दिं.९ फेब्रुवारी रोजी प्रकाश पेंदाने ( २५ वर्ष )हा मंदर येथील रहिवासी होता. तो घरी त्याचा भाऊ व आई-बाबासह राहायचा. प्रकाश खाजगी कंपनीत काम करीत होता.यांने दि.10 फेब्रू रात्री दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली ही बाब सकाळी 10 वाजताचा सुमारास उघडकीस येताच कुटुंबातील सदस्यांनी सदर माहिती पो. स्टे. वणी यांना दिली असुन पोलीसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठवण्यात आला पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाने असा हा आत्महत्येचा मार्ग निवडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.