Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण ११ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करून या कुत्र्यांना ३ दिवस नगरपालिकेने तयार करण्यात आलेल्या डॉगरुममध्ये ठेवण्यात आले.
नगरपालिका प्रशासनाने हजारो रुपयांचा मक्ता देऊन वणी येथील एका संस्थेला(व्यक्तीला ) मोकाट कुत्र्यांवरील निर्बीजीकरणाच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्यस्थितीत शहरात मोकात कुत्र्यांची ही संख्या शेकडोपर्यंत पोहोचली आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतर तसेच लहान मुलाचे लचके तोडल्याची एक घटना चिखलगाव हद्दीत घडल्यानंतर आता .. अखेर निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांच्या वाढत जाणाऱ्या संख्येत काही प्रमाणात घट होणार आहे.
•अशा प्रकारे करण्यात येत आहे काम…
१. न.पा.कडून सकाळी डॉग व्हॅनमधून ज्या भागात कुत्र्यांची संख्या जास्त आहे. तसेच त्याठिकाणी आक्रमक कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अशा भागात जाऊन कुत्र्यांना पकडले जात आहे.
२. पहिल्या दिवशी शहरातील मार्केट एरिया या भागातील सुमारे १२ कुत्रे पकडण्यात आली. त्यापैकी ११ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
३. कुत्रा पकडून आणल्यानंतर त्या कुत्र्याला जेवण दिले जाते. प्राथमिक तपासण्या करून त्या कुत्र्याची शस्त्रक्रिया केली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर न.पालिकेने एका रुग्णालयात तयार केलेल्या डॉगरुममध्ये ३ दिवस या कुत्र्यांना ठेवले जाते.
४. ३ दिवसानंतर ज्या ठिकाणावरून कुत्र्याला पकडले आहे. त्याच ठिकाणी या कुत्र्यांना सोडले जाणार आहे. तसेच शस्त्रक्रिया झाल्याची ओळख म्हणून कुत्र्याचा एका बाजूचा कान व्ही ( V -shape)आकारात कापला जातो
कोट….
” डॉगरुममध्ये एकाचवेळी ३० कुत्रे थांबतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर ३ दिवस त्यांना निगराणीखाली( observation) ठेवण्यात येत आहे. तसेच ज्या भागातून कुत्रा आणला आहे. त्याच भागात नंतर या कुत्र्यांना सोडले जात आहे.- रीषिकेश वायदंडे (स्वच्छता निरिक्षक, वणी नगरपरिषद)

