Ajay Kandewar,Wani:- वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता पोलिस प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात आला आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी अशा १२३ वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार असल्याने वाहनांच्या मूळ मालकांनी मालकी हक्क, वारसा, तारण याबाबतचे मूळ दस्ताऐवज सादर करून वाहन घेऊन जावे अन्यथा त्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी दिली.
वणी पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या दुचाकीसह इतर वाहने खूप वर्षांपासून लावून ठेवलेली आहेत. यातील अनेक वाहनधारकांनी वाहन ताब्यात घेण्याबाबत अनास्था दाखवली आहे. त्यात अपघातासह गुन्ह्यातील वाहन घरी नको या मानसिकतेमुळेही वाहने पडून आहेत. पण यामुळे पोलीस ठाण्यांना बकालवस्था आली आहे. शिवाय या वाहनांची गणना, सुरक्षेचाही ताण वाढत आहे.
पोलीस ठाण्यांचे सुशोभिकरणासह इतर उपक्रम राबविण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक यांनी बेवारस असलेली व ठाण्यात पडून असलेली वाहने मूळ मालकांना परत देणे किंवा त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत म्हणून पोलीस स्टेशन वणी येथे वाहनाचे मुळ कागदोपत्री दस्तऐवजासह हजर यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास बेवारस वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, त्यानंतर कोणतेही आक्षेप हरकत नोंद घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.उपविभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेश क्रमांक महसूल सहायत/उपविभागीय दंडाधिकारी/गृहशाखा/2025 अन्वये पोलीस स्टेशन वणी जि.यवतमाळ येथे दि 25 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता पासुन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येणार आहे. म्हणूनच या बेवारस गाड्यांचा कोणी वाली असेल तर तात्काळ यावें.

