Vidharbh News Wani l अजय कंडेवार :- सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर निमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने वणी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल नांदेपेरा रोड वणी येथे रविवार दिनांक 22 सप्टेंबर ला निःशुल्क भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व रोगावर निदान व उपचार करण्यात येणार आहे. शिबीर स्थळावर नोंदणी मोफत सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत होणार आहे. अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.
शिबिरात पुढील आजाराची तपासणी व उपचार केल्या जाईल. रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधड करणे इत्यादी.
डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड), मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार, हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकारासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घश्याचे सर्व आजार, संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार, खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार, दमा, बरेच दिवसाचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी आजारावर मोफत तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी व उपचार होणार आहे. भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल. अतिविशिष्ट चाचण्या (CT Scan, MRI इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत
रुग्णाचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल. फाटलेले ओठ, दुभंगलेला टाळू (जांभाड) तसेच जन्मतः असलेल्या मुखविकृतीवर शस्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत होणार आहे. भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील.
शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे राशन कार्ड वर नाव असलेल्या सर्व लोकांचे ओरिजनल आधार कार्ड हे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत उपचार घेण्यासाठी आणावे. नोंदणी करीता 9028095997, 9823304087, 9767899040,8208228280, 8308313956, 3200985,9665828291, 8855847232, 9552299300, 9372162636, 8411047174 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.