•दारूबंदीचे 10, जुगार 5 केसेस तर 6 अवैध व्यवसायिक हद्दपार.
अजय कंडेवार,वणी :- होळी, धुलीवंदन सणानिमित्त शांततामय वातावरणात पार पाडण्याचा दृष्टीने पोलीस अधिक्षक ,यवतमाळ यांनी विशेष मोहिमेसाठी (The special campaign of the police will continue on the occasion)वणी पोलीस स्टेशन मध्ये पथक तयार करून दारूबंदीचे 10, जुगार 5 केसेस तर 6 अवैध व्यवसायिक हद्दपार केले.
दि.4 मार्च ते 6 मार्च पर्यंत वणी पोलिसांनी अवैद्य धंदयावर विशेष मोहीम राबवुन फौजदारी दंड कलम 144 (1) पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण 6 अवैध व्यावसायिकांना होळी या सणानिमीत्त हद्दपार करण्यात आले. तर दार बंदी अधिनियम अंतर्गत एकुण 10 केसेस करण्यात आल्या असुन 23,481 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.तसेच जुगार अंतर्गत एकुण 5 केसेस करण्यात आले असुन 6730 रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
“ही मोहीम आगामी सणानिमीत्त सुरूच राहणार (The special campaign of the police will continue on the occasion of the upcoming festival as well.)असुन अवैध व्यवसाय करणारे तसेच दारू पिऊन वाहन चालविणारे यांचे विरूध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे.मोठ्या संख्येने नागरीक मद्य प्राशन करुन वाहने वेगात व धोकादायकरित्या चालवुन अपघात करुन स्वतःचे तसेच इतरांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण करत असल्याने सदर वाहनचालकांवर वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे.” – प्रदिप शिरस्कर, ठाणेदार पोलीस स्टेशन, वणी
ही कारवाई पी.आय.प्रदिप शिरस्कर ठाणेदार पो.स्टे. वणी यांचा मार्गदर्शनात डी.बी पथकचे ए.पी.आय माधव शिंदे,सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, हरीन्द्रकुमार भारती, सागर सिडाम व पुरूषोत्तम डडमल करीत आहेत.