Tuesday, February 17, 2026
Homeयवतमाळआंतरराष्ट्रीय सहकार वर्षनिमित्त "सभासद मेळावा"

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षनिमित्त “सभासद मेळावा”

•मारेगांवमध्ये होणार विशेष सम्मेलन ”

अजय कंडेवार, वणी – आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ने समस्त सभासदांसाठी विशेष सभासद मेळावा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वा .शेतकरी सुविधा केंद्र, मारेगांव येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ) नानासाहेब चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून (समन्वयक, राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, मुंबई व अध्यक्ष, पगारदार पतसंस्था संचालक, यवतमाळ) राजुदास जाधव उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे (अध्यक्ष रंगनाथ स्वामी ना. सह.पत म. वणी) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या सभासद मेळाव्यात ठेवीदारांचा सत्कार, कर्जदारांचा विशेष सत्कार तसेच संस्थेत विशेष योगदान देणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय सभासदांसाठी सहकार प्रशिक्षणसुद्धा आयोजित करण्यात आले आहे, ज्यामुळे सदस्यांना अनुभव आणि ज्ञानाचा आदान-प्रदान करण्यासाठी अनमोल व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन मारेगांव शाखेतर्फे करण्यात आले असून, या कार्यक्रमात विवेकानंद मांडवकर (उपाध्यक्ष) तसेच संचालक मंडळ –परिक्षीत एकरे, सुधीर दामले, हरीशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, अॅड. घनश्याम निखाडे, डॉ. भुपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अंडेलवार, अरविंद ठाकरे, सुनिल देठे, छाया ठाकुरवार, निमा जिवने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे आणि शाखा व्यवस्थापक संतोष घुगूल उपस्थित राहणार आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments