Thursday, March 5, 2026
HomeBreaking Newsअरेच्चा...... वणीत तीन तीन "जिल्हाउपाध्यक्ष पद" आले रे बाबा.....!

अरेच्चा…… वणीत तीन तीन “जिल्हाउपाध्यक्ष पद” आले रे बाबा…..!

•भाजपची पुन्हा हिस्ट्री.,

Ajay kandewar, Wani : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन बांधणीकरीता नवीन टीम बनविली आहे.त्या माध्यमातून भाजपने वणीलाच तब्बल तीन जिल्हा उपाध्यक्षांची निवड करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात आली असल्याचे स्पष्ट दिसते. त्यातच, आता भाजपने राज्यातील यवतमाळ जिल्ह्यासाठी भाजपच्या (BJP) अनेक पदांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यातील नवनियुक्त दहा उपाध्यक्ष पैकी वणीलाच चक्क 3 जिल्हा उपाध्यक्षपदासाठी पदे दिल्याने चर्चेला ऊत आला आहे.

वणीत पद आलेल्या यादीत पहिले जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलूरकर दुसरे संजय पिंपळशेंडे तर तिसरा नवखा चेहरा म्हणजेच कुणाल चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली.विशेषतः या नियुक्तीमध्ये नवीन चेहरा म्हणून युवकाला संधी देण्यात आली. ते म्हणजे कुणाल चोरडिया आहे. आता येत्या काळात या तीन तीन उपाध्यक्षात कोणता जिल्हाउपाध्यक्ष एक्टिव राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनेक दिग्गजांचा यांच्या नेतृत्वाच पक्षाने कात टाकून नव्याने उभारी घेतल्याचे दिसते. अशातच आगामी स्थानिक निवडणूकीसाठी भाजप पक्ष जोराने कंबर कसताना दिसत असून आपली छाप आगामी निवडणूकीत पाडून दाखवेल असे ही या निवडीने दिसत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page