Ajay Kandewar,Wani Vidhansabha:- वणी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे बंडखोर असलेले अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असून गावागावात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वणी मतदारसंघांतून संजय खाडे यांना गोंडवाना टायगर्स संघटना, अर्जनविस संघटना आम आदमी पार्टी ,महाराष्ट्र ट्रायबल आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच राज्य अध्यक्ष महाराष्ट्र ॲड.संतोष भादीकर, जिल्हाध्यक्ष सुमित गेडाम, किशोर गिरडकर, राज्यध्यक्ष चर्मकार महाराष्ट्र संघ सुदाम गावंडे या पदाधिकाऱ्यांनीही सदिच्छा भेट घेऊन संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी ही आता संजय खाडे यांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळें साधारण जनता “खाडे” यांच्या पाठीशी एकवटले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचाही त्यांना पाठिंबा मिळायला सुरूवात झाली आहे.
खाडे” यांच्या पाठीशी एकवटले…….
नुकतीच अनेक गावकऱ्यांची बैठक झाली व त्यात संजय खाडे यांच्या पाठीशी एक संघपणे उभे राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे. संजय खाडे हे वणी विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून काम करत आहेत. गावागावात त्यांनी निर्माण केलेला संपर्क व येथील नागरिकांशी तयार केलेले आपुलकीचे नाते या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहेत.
संजय खाडे यांनी शकडो कुटुंबांबरोबर जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. त्यामुळेच वणी मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा त्यांना मिळत चालला आहे. आपण विकासाचा चेहरा म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक संघटनांही त्यांचे चांगले व्यक्तिमत्व ओळखून त्यांचा पाठीशी उभे राहत आहेत.