•मनसे नेते राजू उंबरकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.
अजय कंडेवार,वणी:- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत सोमवारी (ता.21 ऑगस्ट) सकाळी येथील तहसील, पंचायत समिती, बांधकाम विभाग, नगरपंचायत या कार्यालयांमध्ये तुरळक कर्मचारी वगळता अनेकजण साडेदहापर्यंतही कार्यालयात गैरहजर होते. त्याकरिता मनसे नेते राजू उंबरकर यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत त्या अधिकाऱ्यांना नक्षलवादी यांनी उचलून तर नेले नसावे अशी शंका व्यक्त करीत वणी पोलिस स्टेशन येथे चौकशी करण्याकरिता एक अनोखी तक्रार देण्यात आले Kidnapping of officers, employees..MNS leader Raju Umbarkar directly reached the police station..
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत मंगळवारी (ता.21) सकाळी येथील तहसील, पंचायत समिती, बांधकाम विभाग, नगरपंचायत या कार्यालयांमध्ये तुरळक कर्मचारी वगळता अनेक जण साडेदहापर्यंतही कार्यालयात गैरहजर होते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्यातील शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय शासनाने ता.१२ फेब्रुवारी रोजी घेतला. त्याची अंमलबजावनिही केली जात असून प्रत्येक आठवड्यात शनिवारी व रविवारी कार्यालयांना सुटी असणार आहे.पाच दिवसांचा आठवडा करताना शासनाने कर्मचाऱ्यांना दररोजच्या कामकाजात 45 मिनिटांचा वेळ वाढविला असून सकाळी 9.45 ते सायंकाळी 10.30 यावेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.या आदेशाची अमंलबजावणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंदात सुटीचा मजा लुटली. परंतू हे कर्मचारी कार्यालयात येण्याची वेळ मात्र विसरले.
वणी शहरातील अनेक कार्यालयात अधिकाऱ्यांची अनुपस्थिती मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी स्वतः पाहणी करून केल्यास असे आढळले की, या या लोकांची ईथे सर्वांची उपस्थीती आहे असे त्यांच्या सांगण्यानुसार त्यांना वाटले लोक इथे उपस्थीत आहे म्हणुन त्यांच्या प्रत्येक कार्यालयात जाऊन पाहीले असता हे कोणतेही कर्मचारी व अधिकारी तिथे उपस्थित नाही किंबहुना त्यांच्या कार्यक्षेत्रातही आढळले नाही म्हणुन राजू उंबरकर यांना शंका आली की, या अधिकाऱ्यांना नक्षलवादी यांनी उचलून तर नेले नसावे अशी शंका/भीती आहे कींवा या अधिका-याला कोणी काही केले तर नाही असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी थेट वणी पोलिस स्टेशन गाठत रीतसर तक्रार करून त्यांना शोधून काढून वणी पोलीस प्रशासनाने याची चौकशी करावी,असे तक्रारीत म्हंटले आहे.