Tuesday, April 21, 2026
HomeBreaking Newsअजय शेंडेचं बलिदान – समाजाच्या एकतेचं शंखनाद...

अजय शेंडेचं बलिदान – समाजाच्या एकतेचं शंखनाद…

सुसाईड नोटने समाजात नवी ठिणगी पेटवली. •"त्या चिठ्ठीने" आत्महत्येच कारण आलं समोर

Ajay kandewar,Wani: ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आपले प्राण अर्पण करणारा यवतमाळ जिल्ह्यातील वणीचा तरुण अजय शेंडे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात कोरला जात आहे. त्याने केलेलं बलिदान हे केवळ आत्मत्याग नाही, तर समाजाच्या हक्कासाठी दिलेला इतिहासातील सुवर्णाक्षरात लिहिला जाणारा संदेश आहे. याच विशेष कारण एक रुमालीत आढळलेल्या चिठ्ठीत सर्वकाही बोलून गेल आहे.

अजय शेंडे असे मृत तरूणाचे नाव आहे. १७ सप्टेंबरपासून तरूण बेपत्ता होता. अजय शेंडे हा अत्यंत साध स्वभाव आणि लोकांसाठी नेहमी झटणारा असा त्याचा स्वभाव होता.मागील १३ दिवसांपासून अजय घरात परतलाच नव्हता. त्याचे कुटुंब त्याचा शोध घेत होते. मात्र, तब्बल १३ दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.कायर येथील अजय चा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह वणीत आढळला.अजय शेंडे ओबीसी आंदोलक होता. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यामुळे त्यानं आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तरूणाच्या मृतदेहाजवळ नातेवाईकांना सुसाईड नोटही सापडली.रूमालात तरूणानं सुसाईड नोट गुंडाळली असल्याची माहिती आहे. तसेच तरूणाजवळ विषारी औषध खरेदी केलेली पावतीही आढळली. विषारी औषध पिऊनच त्यांनं आयुष्य संपवलं असल्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. तरूणाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

•अजयचं बलिदान वाया जाणार नाही…

१३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अजयचा मृतदेह आढळून आलेला असला, तरी त्याच्या रूमालात सापडलेल्या सुसाईड नोटने समाजात नवी ठिणगी पेटवली आहे. “आपल्या समाजासाठी, भावी पिढ्यांसाठी हा संघर्ष आहे” अशी भावना या पत्रातून दिसून येते.अजय हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजाचा पुत्र ठरला आहे. त्याच्या बलिदानाने अनेकांच्या मनात समाजासाठी लढण्याची जिद्द आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. आज गावोगाव चर्चा रंगतेय.समाजातील ज्येष्ठ मंडळी म्हणतात,अजयचं बलिदान वाया जाणार नाही. त्याने दाखवलेला मार्ग आम्हाला एकतेचं बळ देतो. भावी आरक्षण टिकवण्याचा हा लढा अधिक जोमाने लढला जाईल.अजयच्या निधनाने दुःख जरी पसरले असले, तरी त्याच्या स्मृतीतून निर्माण झालेली जागृती ही समाजाला एकत्र आणणारी प्रेरणादायी बाब ठरली आहे.

नोट:- सदर sucide note विदर्भ न्यूज पोर्टल पडताळणी करत नाही. सदर पुरावा चौकशीचा भाग आहे 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page