Ajay Kandewar,Wani:- ओबीसी आरक्षणासाठी आत्मबलिदान देणारे अजय शेंडे यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण कायर गाव शोकसागरात बुडाला आहे. या कठीण प्रसंगात ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ साहेबांनी शेंडे कुटुंबीयांशी थेट फोनवरून संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.
या संवादादरम्यान अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर यांच्या माध्यमातून शेंडे कुटुंबीयांच्या नेमक्या वेदना,प्रश्न आणि चिंता ओबीसी नेते तथा मंत्री भुजबळ पोहोचवण्यात आल्या. ओबीसी नेते तथा मंत्री भुजबळ यांनी ते काळजीपूर्वक ऐकून घेत कुटुंबीयांना “तुम्ही एकटे नाही, माझे संपूर्ण सहकार्य तुमच्यासोबत आहे” असा दिलासा देत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.या प्रसंगी शेंडे कुटुंबीयांसोबत गावकरी, तरुण, महिला व जवळचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सामूहिक शोकभावनेने सर्वजण कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले. गावकऱ्यांनी या घटनेला अन्यायाविरुद्धचा आवाज ठरवून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करणार आहेत.
अजय शेंडे यांचे बलिदान केवळ एका कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. गावातील प्रत्येक डोळा अश्रूंनी भरून गेला असला तरी, या बलिदानातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या लढ्याला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

