Ajay Kandewar,Wani:- संघटन व पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या ध्येयधोरणा विरुध्द कार्य करणे यासह इतर अनेक तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेवून यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांची संभाजी ब्रिगेड मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच वणी तालुका अध्यक्ष गणेश बोंडे यांचावरही पक्ष विरोधी कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट सूचक विधान संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर दिले.
गेल्या ३० वर्षापासून मराठा सेवा संघाचा एक कक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात प्रचंड आक्रमकपणे कार्य करत आलेली आहे. नंतरच्या काळात २०१६ ला संभाजी ब्रिगेडने अधिकृत राजकीय भूमिका घेवून पक्षाची ध्येय धोरणे व संहिता ठरली व अडीच वर्षापासुन संभाजी ब्रिगेड उद्धव ठाकरे यांना जाहिरित्या पाठिंबा देत सोबत राहत होते परंतु ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने मित्र पक्ष संभाजी ब्रिगेड यांना एकही जागा वाटप केलें नाही आणि ते उबाठा या पक्षातून बाहेर आलें व स्वबळावर विधानसभा निवडणुकां लढण्याचा निर्णय घेतला त्यात वणी विधानसभेतून इच्छुक म्हणून “अजय धोबे “स्वतः पक्षाकडे विनंती करून कशी बशी विधानसभेची उमेदवारी मागितली व ए.बी फार्म देखील आणला व नामांकन फॉर्म पक्षाच्या नावावर भरले देखील असे वरिष्ठांचे म्हणणे आहे तसेच परंतु नामांकन मागें घेण्याचा दिवशी त्यांनी पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता नामांकन मागें घेतले . त्याव्यक्तीरिक्त एक पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, वणी तालुक्याची कार्यकारिणीतील तालुका अध्यक्ष गणेश बोंडे व काही कार्यकर्ते यांनी मविआ चे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांना पक्ष परस्पर पत्र काढून जाहीर पाठिंबा दर्शविला. ही बाब वरिष्ठांना कळताच पक्ष संघटन व पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या ध्येयधोरणा विरुध्द कार्य करणे यासह इतर अनेक तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेवून यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांची संभाजी ब्रिगेड मधून हकालपट्टी करण्यात आली.
•निवडणुका स्वबळावर लढावे स्पष्ट संकेत असतानाही स्व- निर्णय का…?
“अजय धोबे यांनी पक्षाला विश्वासात न घेता अश्या पद्धतीने अस का केलं असावं? पण जिल्हाध्यक्षच का सर्व पदाधिकाऱ्यांचा समंतीने पाठींबा म्हटल्या गेलं होत तरीहि असं का?पण आधीच वरिष्ठांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढावे स्पष्ट संकेत दिले होते.या घेतलेल्या निर्णयाने “ही कारवाई झाली आहे . असं वरिष्ठांचे म्हणणे आहे”
• नवीन कार्यकारिणी गठित करणार ……
“यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता वणी येथील उबाठा गटाचा उमेदवारीला पाठिंबा दिला त्यामुळं धोबे यांची संभाजी ब्रिगेड मधून पत्र काढून हकालपट्टी केली आहे त्यानंतर लगेच वणी तालुका अध्यक्ष गणेश बोंडे यांचावरही पक्ष विरोधी कारवाई होणारच आहे त्यांनाही हकालपट्टी करणार आहोतच व वणी तालुक्यातील व अन्य काहीं ठिकाणातील नवीन कार्यकारिणी लवकरच गठित करणार आहों.अजय धोबे राजकिय व सामाजिक क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेड नावाचा वापर किंवा गैरवापर करू नये अन्यथा कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल– संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर.