Friday, April 17, 2026
HomeBreakingअखेर...."अमोल मांडवकर " हेच पठारपुरचे पोलीस पाटील......!

अखेर….”अमोल मांडवकर ” हेच पठारपुरचे पोलीस पाटील……!

•आयुक्तांचा आदेश वणी उपविभागीय कार्यालयात धडकला. •अनेकांची भंबेरी उडाली असल्याच सध्याचं चित्र.

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील पठारपूर येथील पोलिस पाटील अमोल मांडवकर आहे .यांच्यावर एकाचवेळी दोन ठिकाणी पूर्णवेळ सेवा बजावत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.मात्र, संबंधित नियमांचा अभ्यास करून उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी तत्काळ मांडवकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.परंतु त्या आदेशावर अपर आयुक्त अमरावती विभाग, यांनी (१८ जून) रोजी युक्तीवाद झाले तसेच सादर कागदपत्रे विचारात घेतलें व स्पष्ट निर्णय करण्यात आला की,सुनावणीच्या पहिल्या तारखेपर्यंत अमोल मांडवकर यांचें “पोलीस पाटील पद हे जैसे थे” म्हणजेच (Stay…) पूर्व परिस्थितीत ठेवण्यात यावें असे लेखी आदेश वणी उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचा कार्यालयात धडकले. या आदेशाने अनेकांची भंबेरी उडाली असल्याचं विदारक चित्र आहे.

अमोल मांडवकर 19 डिसेंबर 2015 पासून पठारपूर गावातील पोलिस पाटील पदावर कार्यरत आहेत. तसेच 1 सप्टेंबर 2017 पासून वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत स्थायी कर्मचारी म्हणूनही कार्यरत आहेत. एका व्यक्तीने एकाचवेळी दोन ठिकाणी पूर्णवेळ नोकरी करणे हे महाराष्ट्र पोलिस पाटील नियमावलीच्या विरोधात आहे अशी तक्रारकर्त्यानी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित नियमांचा अभ्यास करून उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी तत्काळ मांडवकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.परंतु त्या आदेशावर अपर आयुक्त अमरावती विभाग, यांनी (१८ जून) रोजी युक्तीवाद झाले तसेच सादर कागदपत्रे विचारात घेतलें व स्पष्ट निर्णय करण्यात आला की,सुनावणीच्या पहिल्या तारखेपर्यंत अमोल मांडवकर यांचें “पोलीस पाटील पद हे जैसे थे” म्हणजेच (Stay…) पूर्व परिस्थितीत ठेवण्यात यावें असे लेखी आदेश वणी उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचा कार्यालयात धडकले.या आदेशाने अनेकांना जबर धक्का लागल्याचे दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास येतं आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page