Saturday, May 2, 2026
Homeमोहदाबघा....."या समस्यांसाठी" मोहदा उपसरपंचाची धडपड.......!

बघा…..”या समस्यांसाठी” मोहदा उपसरपंचाची धडपड…….!

• नेहमी "उपसरपंच" च गावकऱ्यांसाठी अतोनात करताहेत प्रयत्न. • मागील पंचवार्षिक पासून "ग्राम सदस्य" फक्त पद उपभोगण्यात व्यस्त.? • "फक्त मीटिंग घ्या त्यात विरोध करा" एव्हढच काम ग्रा.पं.सदस्य करताना दिसते आहे.

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील स्टोन क्रेशर कंपन्यासाठी मोहदा गाव हे सुप्रसिद्ध मानले जाते.या गावाकरीता नेहमीच गावातील ज्वलंत प्रश्न उचलून धरणारा उपसरपंच सचिन रासेकर यांनी गावठाण करिता वेगळे फिटर देण्यासाठी म.रा.वि.वि.कं.मर्या वणी चें उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना मागणी केली.

मोहदा हे २००३ लोकसंख्येचे गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात स्टोन क्रेशर कंपन्या निर्माण झाल्या आहे. मोहदा गावठाणा व १० स्टोन क्रेशर ला एकाच फिटर मधुन विद्युत सप्लाय जात आहे. स्टोन क्रेशर साठी जाणारा विद्युत सप्लाय हा अनेक खदाणीत व खदानीच्या आजूबाजूने गेला असल्यामुळे खदाणीमध्ये खोदकाम करतांना ब्लास्टिंग होत असल्याने त्या ब्लास्टिंगमुळे अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. तसेच दररोज स्टोन क्रेशर मध्ये डी.ओ.टाकणे, केबल बदलविणे अशा अनेक कारणामुळे वारंवार विद्युत पुरवठा बंद करित असल्यामुळे मोहदा येथील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळें मोहदा गावठाणला वेगळे फिटर देण्यात यावे,अशी आर्त मागणी मोहदा उपसरपंच सचिन रासेकर यांनी केली आहे.

•ग्रा. पं. सदस्य बनले “पद भूषण”…..

“मागील अनेक वर्षांपासून गावातील उपसरपंच असलेले सचिन रासेकर यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडलेले आहेत. हे अनेक उदाहरणं त्यांच्या निवेदनातून दिसून येतं .परंतु एकच नेहमी प्रश्न उपस्थित होतो की गावात फक्त सरपंच आणि उपसरपंच हेच पुढाकार घेतात आणि नागरिकांनी निवडून दिलेले सदस्य “मात्र जैसे तिच्या परिस्थितीत खुर्चीवर थान मांडून बसतात मग यावरून असं कळते की, निवडून दिलेले हे जे सदस्य आहेत यांनी फक्त मतं घेऊन आपलं “पद भूषण” केलं असं सहजचित्र मोहदा ग्रामपंचायतमध्ये दिसत आहे. नागरिकांचे प्रश्न गेले चुलीत हमें क्या अशी स्थिती सध्यातरी दिसून येतं आहे.”

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page