Sunday, April 19, 2026
HomeBreaking Newsसुकणेगावात ठेकेदाराचा भोंगळ ...काम बंद,पण बिल जबरदस्त....!

सुकणेगावात ठेकेदाराचा भोंगळ …काम बंद,पण बिल जबरदस्त….!

•"त्या" ठेकेदाराचे कामही सुस्त पद्धतीत. •ज्यू इंजि व डेप्युटी इंजि झोपेत की ‘डील’मध्ये ?

Ajay Kandewar, Wani :-तालुक्यातील सुकणेगाव येथे प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत 59 लाख 81 हजार रुपये खर्चाने बांधण्यात येणाऱ्या आदर्श शाळेच्या दोन खोल्यांच्या इमारतीत ठेकेदाराचा भोंगळ उघडकीस आला आहे. कामाला अद्याप योग्य सुरुवात झाली नसतानाच ठेकेदाराने तब्बल एक महिन्यांपूर्वीच लाखोंचे बिल जिल्हा परिषद बांधकाम विभागीय कार्यालयाकडे सादर केले, ही धक्कादायक घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.

“विदर्भ न्यूज”ने ठेका माफियांचा भोंगळ उघड करण्याचा संकल्प केला असून, ही साखळी सुकणेगावपासूनच सुरू झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, “वणी उपविभागात बोगस ठेकेदारांचा राजा बाजार” या विदर्भ न्यूजच्या बातमीनंतर संबंधित ठेकेदाराने 29 ऑक्टोबर रोजीच साईटवर थोडंसं मटेरियल टाकून काम सुरू करण्याचा दिखावा केला.परंतु, काम सुरू होण्याआधीच 20% टक्के निधी उपलब्ध झाले असल्याची माहिती संबंधित ठेकेदाराला मिळताच त्यावर बिल रेकॉर्ड करून विभागीय कार्यालयात जमा झालं, हा धक्कादायक प्रकार नुसता गैरव्यवहार नव्हे, तर “बांधकाम विभागातील ज्यू आणि डेप्युटी इंजिनीयरांचं संगनमत” असल्याचं पुराव्यानिशी स्पष्ट होतं आहे.शाळेच्या इमारतीचा फक्त जोता (Base) तयार होत असताना, त्याचा खर्च तब्बल निधीचा 20 % दाखवण्यात आला आहे. 20% रक्कम बिल रेकॉर्डवर अदा झालं असून बिलाची नोंदणी आणि सही प्रक्रिया पूर्ण झाल्याचा पुरावा गावकऱ्यांनी मिळवला आहे.यावरून ठाम दिसतं की, ठेकेदार आणि जी.प. बांधकाम विभागातील ज्युनियर व डेप्युटी इंजिनीयर हे “झोपेत” नसून संगनमतात “जागे” आहे. विशेषतः काम पाहिल्याशिवाय बिल मंजूर कसं?बिलावर सही कोणी केली? निरीक्षण न करता निधी कसा सोडला जातो?हे सर्व प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहेत, पण अधिकारी मात्र “दिसत नाही, ऐकू येत नाही” अशा भूमिकेत शांत बसले आहेत.गावकऱ्यांनी जिल्हा परिषद वणी बांधकाम विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे.“काम न झालं तरी बिल मंजूर होतं, हे ठेकेदाराचं जादू आहे की इंजिनीयरचा आशीर्वाद?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा गावकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत.

• “विदर्भ न्यूज ” चा इशारा:

वणी तालुक्यातील प्रत्येक अशा “ठेका माफियांचा” भोंगळ क्रमशः उघड केला जाणार आहे.सुकणेगावानंतर आता पुढचा क्रम कोणाचा, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page