Sunday, April 19, 2026
HomeBreaking Newsसावंगी (जुनी) येथे तीन दिवसीय जगदंबा महोत्सव.......

सावंगी (जुनी) येथे तीन दिवसीय जगदंबा महोत्सव…….

Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील जगदंबा माऊली देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने 1 ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत तीन दिवसीय जगदंबा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

मंदिर परिसर दीपोत्सव, तोरण आणि पताकांनी सजविण्यात आला असून 1 नोव्हेंबर रोजी रात्री भजन कार्यक्रम,2 नोव्हेंबर रोजी भारूडाचार्य सागर महाराज नंदुरकर (अजुनसरा) यांचे देवी गोंधळातून प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. त्यांना मृदुंग सम्राट समीर महाराज वैद्य साथसंगत देतील.3 नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामसफाई व रांगोळी सजावट,देवीपूजनानंतर बैलजोडी,पालखी आणि दिंडी काढली जाईल. दुपारी संत खेमराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील भाविक, बाहेरगावी असलेले गणगोत व सासुरवाशी मुली मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.मंदिर समिती व ग्रामस्थांनी सर्वांनी संतदर्शन, आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page