Sunday, May 31, 2026
HomeCityत्या....फेरीवाल्यांवर वाहतूक पोलिसांची अशी वागणूक चुकीची....

त्या….फेरीवाल्यांवर वाहतूक पोलिसांची अशी वागणूक चुकीची….

Wani:- बेकारी आणि बेरोजगारी वर पर्याय म्हणून रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब फेरीवाल्यांना वाहतूक उपशाखा त्यांचे व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त करत हुकूमशाही गाजवत असल्याचं  आरोप करीत मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी याबाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हा प्रकार थांबविण्याची मागणी केली आहे.

रस्त्यावर अतिक्रमण करून धंदे थाटने व वाहतुकीस अडथळा निर्माण करणे याला मनसे कधीही समर्थन करीत नाही. वाहतूक पोलिस त्यांचे व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त करून त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहे या प्रकाराला मनसेच्या वाहतूक सेनेने विरोध दर्शविला आहे.

शहरामध्ये कापडाची व अन्य साहित्यांची मोठी बाजारपेठ आहे. सध्या शाळकरी विद्यार्थ्यांची गणवेशासाठी रेलचेल व कपड्यांच्या दरात व्यावसायिकांकडून सेलच्या नावावर सूट देऊन ग्राहक खेचण्याची चालू असलेली स्पर्धा यामुळे मुख्य बाजारपेठेत वाहनांची मोठी वर्दळ निर्माण झाली आहे. एका दुकानापुढे ४ वाहने पार्किंग करण्याची क्षमता असताना १० ते १२ वाहने लावण्यात येत आहे. तर उर्वरित वाहने रस्त्यावर आल्याने रस्ते पूर्णतः बंद होत आहे. परिणामी पायी चालणाऱ्या ग्राहकांना सुद्धा कसाबसा रस्ता काढून जावे लागत आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी कोणतेही कारवाई करत नाही. असा आरोप होत आहे.

त्यामुळे रस्त्यावर लघु व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यवसायिकां कडून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यास त्यांना समज देऊन सक्त ताकीद द्यावी व या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व स्थानिक मुख्याधिकारी यांना सुद्धा देण्यात आली..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page