Tuesday, July 14, 2026
HomeBreaking Newsवणीत काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’....

वणीत काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’….

Ajay Wani : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी आणि देणगी निधीच्या व्यवस्थापनासंदर्भात समोर आलेल्या कथित गैरव्यवहार व चोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी वणी तालुका काँग्रेस कमिटी आणि वणी शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने आज आंबेडकर चौकातील हनुमान मंदिर येथे ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन’ करण्यात आले.

धार्मिक श्रद्धेशी निगडित निधीच्या व्यवस्थापनावर कोणत्याही स्वरूपाचे संशय निर्माण झाल्यास त्याचे निराकरण केवळ आरोप-प्रत्यारोपातून नव्हे, तर वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक चौकशीच्या माध्यमातून होणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांबाबत कथित गैरव्यवहाराचे आरोप होत असतील, तर त्या आरोपांतील सत्य जनतेसमोर येणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनाची सुरुवात हनुमान मंदिरात श्रीराम नामाचे भजन आणि आरती करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांततामय सत्याग्रहाच्या माध्यमातून कथित गैरव्यवहाराची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. धार्मिक श्रद्धेचा विषय राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता, निधीच्या व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या कसोटीवर तपासला गेला पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व विकेश पानघाटे, जय आबड, श्यामा दीदी तोटावार, सुरज पुल्लेवार, रोहित मालेकर, सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, अशोक चिकटे, राजू अंकतवार, फरीद शेख, डॉ. प्रेम मेश्राम, अनंत डुंबारे आणि पांडुरंग पंडिले यांनी केले.आंदोलनाला संजय खाडे, प्रमोद वासेकर, ओम ठाकूर, वंदना आवारी, विवेक मांडवकर, करुणा कांबळे, प्रमोद लोणारे, वंदना धगडी, नीलिमा काळे, जयसिंग गोहोकार, सुरेश बन्सोड, वऱ्हाटे, राजेंद्र कोरडे, जगदीश चौधरी, सचिन पिदूरकर, पुंडलिक गुंजेकर, रवींद्र होकम, राजू काळे, तेजराज बोढे, ज्ञानेश्वर येसेकर, संदेश शंभरकर, मारोती मोवाडे, रवि कांबळे, अशोक नागभीडकर, प्रभाकर मंथनवार, मंगला झिलपे, सुरेखा वडीचार, प्रिया मडावी, मंदा सोनारखन, सविता गंधेवार, सविता रासेकर, कुंदन यातकेलीवर, संध्या रामगिरवार, वामन कुचणकर, विजय गौरकार आणि गिरीश सातपुते यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page