Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsरंगनाथ नगरचे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात ....

रंगनाथ नगरचे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात ….

पोलिसांचा वेगवान दणका,चोरीचा मोबाईल परत .

Ajay kandewar,Wani : शहरातील रंगनाथ नगर येथील दोन चोरट्यांनी बसस्थानक परिसरात मोबाईल चोरल्याची ता.3 सप्टेंबर रोजी घटना घडली. राहुल कुभेकार( रा. राजूर कॉलरी ) आणि बजरंग विठ्ठल परबत (वय 32 वर्ष, रा. निजामपुर ता. रिसोड, जि. वाशिम ) हे वणी बस स्थानकातून चंद्रपूर जाण्याकरीता चंद्रपूर जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे खिशातील मोबाईल चोरून नेल्याची तात्काळ तक्रारी पोलीस स्टेशन वणी येथे दाखल केली होती त्यावर वणी पोलिसात अज्ञातविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ही तक्रार दाखल होताच , पोलिसांनी जलद कारवाई करून अवघ्या काही तासांत दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले.

प्राथमिक माहितीनुसार, बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असल्याचा फायदा घेत हे दोन्ही चोरटे मोबाईल चोरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीच्या आधारे 1) समीर साबीर पठाण वय 19 वर्ष, रा. रंगनाथ नगर वणी आणि 2) अर्जुन गोपाल आडे वय 30 वर्ष रा. रंगनाथ नगर वणी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करीत आरोपींना जेरबंद करण्यात आले. सदर तपास डी बी पथकाचे प्रमुख व त्यांचा चमूने केली.या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात नागरिक व प्रवाशांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page