Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsयवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची तडकाफडकी बदली.....

यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची तडकाफडकी बदली…..

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच.

Ajay Kandewar,Wani:- राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आलंय. तेव्हापासून वरिष्ठ प्रशासनाचा खांदेपालट जोरदार गतीने सुरू आहे. आधी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असल्याचा दिसतंय. त्याचाच भाग म्हणून आता आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे (Ahilyanagar) जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Ahilyanagar Collecter) झाल्याचं समोर येत आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या….?

1. राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. एम.जे. प्रदीप चंद्रेन यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3. बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. जगदीश मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

5. गोपीचंद कदम यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. वैदेही रानडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. डॉ. अर्जुन चिखले यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page