Monday, August 17, 2026
HomeBreakingमोहदा गावात 'लालपरी ' चे जल्लोषात स्वागत......

मोहदा गावात ‘लालपरी ‘ चे जल्लोषात स्वागत……

Ajay,Wani : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली एसटी बससेवा अखेर सुरू झाल्याने मोहदा गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. लालपरी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत चालक व वाहकाचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार केला. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हे वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला मिळालेल्या यशाचे चित्र होते. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचा खासगी वाहनांवरील खर्च व प्रवासाची गैरसोय कमी होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्वागत सोहळ्यास मोहदा सरपंच वर्षा राजुरकर, उपसरपंच सचिन रासेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर तसेच खांदला सरपंच गौरकार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. बससेवा सुरू करण्यासाठी सरपंच वर्षा राजुरकर, उपसरपंच सचिन रासेकर यांनी विजय पिदूरकर यांच्या पुढाकाराने संबंधित विभागाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने ही सेवा सुरू झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी सर्व संबंधितांचे आभार मानत बससेवा नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. एसटीच्या आगमनाने मोहदा गावातील वातावरण आनंदाने फुलून गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page