Tuesday, April 21, 2026
Homeवणीमुंगोली गावाच्या फेरमूल्यांकन आक्षेपाची दखल घेण्याची गरज .!

मुंगोली गावाच्या फेरमूल्यांकन आक्षेपाची दखल घेण्याची गरज .!

•मुंगोली भूमिगत होण्याची शक्यता

•शासनाने त्वरित मंगोलिचे पुनर्वसन करावे ,अन्यथा आंदोलन इशारा.

सुरेंद्र इखारे,वणी – मुंगोलि गावाचे फेर मूल्यांकन आक्षेप अहवाल वेकोलीस देण्याबाबतचे निवेदन मंगोलीचे उपसरपंच गणेश रोडे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे याना दिले.

डब्ल्यू सि एल वणी एरिया अंतर्गत मुंगोली गावाचे पुनर्वसन बाबत वेकोली सोबत बऱ्याचदा ग्रामस्थांनी चर्चा, निवेदन व आंदोलन करून यामध्ये कुर्ली शिवारात पुनर्वसन जागा निश्चित करण्यात आली . परंतु पुनर्वसन कामासाठी गावातील घर व इतर मालमत्ता मूल्यांकन काम वेकोलीने बांधकाम विभागाकडे सोपविले परंतु एका वर्षानंतर अहवाल प्राप्त झाला त्यानंतर वेकोलीने अहवालाचे वाचन केल्यास यामध्ये 32 नागरिकांनी मूल्यांकन कमी झाल्याचे आक्षेप वेकोलीकडे नोंदविला असताना सुद्धा या आक्षेपाची दखल घेण्यात आली नाही. जेव्हा विचारणा केली असता फेर मूल्यांकणासाठी उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग यांचेकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अजून प्राप्त झाला नाही असे सांगितले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून गावाचे पुनर्वसन न झाल्याने नागरिकांना जीवन मरणाचा सामना करावा लागत आहे. तरी शासनाचे दुर्लक्ष आहे . गावातील खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घराला हादरे बसून केव्हा घर कोसळेल हे काहीही सांगता येत नाही तसेच कोळश्याच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मोठ्या प्रमाणात झुडपे वाढून वन्य प्राण्यांचा धोका, नदीच्या पुरामुळे गावकऱ्यात भीती यामुळे संपुर्ण ग्रामस्थांचे जीवन अंधारमय झाले असून प्रकल्प ग्रस्तांवर अन्याय होत आहे. तरी बांधकाम विभाग व वेकोली मूग गिळून आहेत यांच्यामुळे ग्रामस्थांचा जीव जात आहे तेव्हा संबधीत विभागाने व शासनाने मंगोलि गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनाला बांधकाम विभाग व वेकोली प्रशासन जबाबदार राहील संबधीत निवेदनाच्या प्रति आमदार संजीवरेड्डी बोडकुरवर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग वणी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर याना पाठविण्यात आले आहे. यावेळी उपस्थित गणेश ना रोडे उपसरपंच , व समस्त ग्रामस्थ होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page