Tuesday, April 21, 2026
HomeBreaking Newsप्रभाग क्रमांक 1 मध्ये युवा उमेदवार "मनोज वाकटी"ला पहिली पसंती....

प्रभाग क्रमांक 1 मध्ये युवा उमेदवार “मनोज वाकटी”ला पहिली पसंती….

•नागरिकांचा उत्साह उफाळला.

Ajay Kandewar,वणी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजकीय समीकरणे तापू लागली असतानाच युवा नेतृत्वाचे प्रतीक म्हणून मनोज वाकटी यांचे नाव जनतेत जोमाने चर्चेत आले आहे. प्रभागातील युवा वर्गाबरोबरच जेष्ठ नागरिकांनीही त्यांना आपली “पहिली पसंती” दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्थानिक पातळीवर मनोज वाकटी हे गेल्या काही वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून,तरुणांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविणारे, क्रीडा व सामाजिक उपक्रमात आघाडीवर राहणारे असे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे प्रभागातील युवकांचा मोठा समूह त्यांच्याभोवती एकवटला असून, प्रचारपूर्व वातावरणातच मनोज यांना प्रभागातील “युवा चेहरा” म्हणून मान्यता मिळाली आहे.नागरिकांमध्ये असा सूर उमटतो आहे की, “प्रभाग क्रमांक 1 ला आता तरुण, उत्साही आणि काम करणारा प्रतिनिधी हवा,” आणि त्या निकषावर मनोज वाकटी हे योग्य पर्याय ठरत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.राजकीय पातळीवरही त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली असून, नगरपरिषद निवडणुकीत मनोज वाकटी यांची झंझावाती उपस्थिती प्रभागात नवा उत्साह निर्माण करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page