Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsनोकरी द्या, भीक नको! हल्लाबोल आंदोलन...

नोकरी द्या, भीक नको! हल्लाबोल आंदोलन…

•GRN+Sidex मुजोर कंपनी विरोधात Shivsena आक्रमक. •जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन .

Ajay Kandewar,Wani:- वेकोलीमधील माती उत्खनन(ओव्हर बर्डन) करणाऱ्या परिसरातील कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार उपलब्ध करून देण्याकरीता बाध्य करावे या करीता यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी वणी SDO यांना निवेदनाद्वारे 10 में तारखेपर्यंत कंपन्यांनी जर भूमीपुत्रांना रोजगार देण्यास मज्जाव केला तर परिसरातील समस्त कंपन्याना 12 में रोजी पासून ” कोणतेच काम करु देणार नाही” असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला होता.

शेवटीं वेकोली प्रशासनाने आणि या मुजोर माती उत्खनन (O.B ) करणाऱ्या कंपन्यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्हणून GRN + SIDEX कंपनी वर “हल्लाबोल आंदोलन” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने युवकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आ. देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात दि.12 में रोजी आंदोलन आयोजित केले आहे.सर्व शिवसैनिक, युवासैनिक,आजी-माजी पदाधिकारी तसेच समस्त युवकांनी व स्थानिक नागरिकांनी सकाळी १० वाजता सदर कंपनित  उपस्थित राहून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page