Wani : राजूर–इजारा–भांदेवाडा मार्गावरील खड्डेमय रस्ते, पाणीपुरवठा आणि भांदेवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी बसथांब्याची मागणी आदी विविध समस्यांसंदर्भात २४ जुलै रोजी दर्शनाताई मानवटकर यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांना सोबत घेत वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक भालर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.या निवेदनात गावातील अनेक मूलभूत प्रश्न मांडण्यात आले असून, त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.आणि शेवटीं तीन दिवसात दर्शनाताई मानवटकर , ग्रामस्थ व HMS चे प्रदीप जेऊरकर यांचा सविस्तर चर्चेने राजूर रस्त्याची डागडुगीसाठी लागणारा साहित्य आल्याची माहिती मिळाली आहे..
निवेदनाची गंभीर दखल घेत क्षेत्रीय महाप्रबंधक भालर यांनी तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन दिले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी राजूर ते रॉ मटेरियल मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन पंप उपलब्ध करून देण्याचे, तसेच भांदेवाडा येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेकोलीच्या माध्यमातून बसथांबा उभारण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. तसेच चार महिन्याचा कालावधीनंतर पक्का डांबरीकरण होणार असल्याची आश्वासन देखील देण्यात आले.महाप्रबंधक भालर वेगाने घेतलेल्या या निर्णयांचे स्वागत करत ग्रामस्थानी आभार व्यक्त केले आहेत. उर्वरित आश्वासनांचीही लवकरच अंमलबजावणी होईल, अशी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी उपस्थित दर्शनाताई मानवटकर,HMS चे प्रदीप जेऊरकर व ग्रामस्थ होते.

