Wednesday, August 5, 2026
HomeBreakingडेव्हिड पेरकावार यांच्यावर'ताई आणि साहेबांचा' विश्वास........

डेव्हिड पेरकावार यांच्यावर’ताई आणि साहेबांचा’ विश्वास……..

Ajay,Wani :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिलेल्या यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीत डेव्हिड पेरकावार यांची जिल्हा काँग्रेस सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आली असून, यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी पाठविलेल्या प्रस्तावास प्रदेश काँग्रेसने मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तसेच या नियुक्तीसाठी चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार वामनराव कासावार यांच्या विशेष शिफारशीसह देविदास काळे आणि प्रमोद वासेकर यांच्य ही सहकार्य आहे.

डेव्हिड पेरकावार यांच्या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेश काँग्रेस सरचिटणीस टीकाराम कोंगरे , ओम ठाकूर, काँग्रेस नेते संजय खाडे, डॅनी सॅन्ड्रावार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने डेव्हिड पेरकावार यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page