Sunday, April 19, 2026
HomeBreakingठाणेदार संतोष मनवर यांच्या MD तस्करांना रट्टा....

ठाणेदार संतोष मनवर यांच्या MD तस्करांना रट्टा….

Ajay Kandewar,Wani:- अमलीपदार्थांविरोधात सुरू असलेल्या कडक मोहिमेत वणी तालुक्यातील शिरपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले असून MD (मेफेड्रोन) ड्रग्स तस्करी प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी रागीब अब्दुल अहमद रब (वय 25, रा. वणी) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वणी–शिरपूर परिसरातील ड्रग्स नेटवर्कला जबरदस्त हादरा बसला आहे.

यापूर्वी पकडण्यात आलेल्या एका आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यातून वणी परिसरात नेटवर्कने सुरू असलेल्या ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश झाला. शिरपूर पोलिसांनी थेट वणी येथे छापा टाकत रागीब अब्दुल रब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6 ग्रॅमचा वर MD प्रकारचा सिंथेटिक अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला अटक करण्यात आली आहे.

या ड्रग्स तस्करी प्रकरणात आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक करून  आली आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हा तपास इथेच थांबणार नसून, गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन या साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाणार आहे.ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शिरपूर पोलिस स्टेशनची धुरा सांभाळणारे नवनियुक्त, कडक शिस्तीचे व निर्भीड निर्णयांसाठी ओळखले जाणारे “सिंघम” ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर पोलिसांनी ड्रग माफियांना थेट आव्हान देत प्रभावी कारवाई केली असून नागरिकांमध्येही पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.

सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक कुमार चिंता ,अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उप.वि.पो.अ.वणी सुरेश दळवे,पोलीस स्टेशन शिरपुर येथील ठाणेदार संतोष मनवर व पो.उप.नि धिरज गुल्हाणे, ईक्वाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे सुनील दुबे, विजय फुल्लुके यानी पार पाडली.

ठाणेदार संतोष मनोहर यांनी ठाम शब्दांत सांगितले की, येत्या काळात ड्रग्स तस्करीशी संबंधित कोणताही संशयित पोलिसांच्या हातातून सुटणार नाही. शिरपूर व आसपासच्या भागात नशेच्या धंद्याला पूर्णपणे चाप लावण्यासाठी पोलिस सतर्क असून, ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page