Wednesday, August 19, 2026
HomeBreakingआरोग्य सेवा हीच खरी लोकसेवा : आमदार संजय देरकर

आरोग्य सेवा हीच खरी लोकसेवा : आमदार संजय देरकर

Wani:- वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने मारेगाव येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात सुमारे हजारो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. गरजू रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. आरोग्यसेवा हीच खरी लोकसेवा असून ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार संजय देरकर यांनी सांगितले.

उपस्थित संजय निखाडे, निलावाड, भिमराव व्हनखंडे, डॉ. मनीष मस्की, पुरुषोत्तम बुट्टे, डिमान टोंगे, गणपत लेडांगे, किरणताई देरकर, सुनील कातकडे, इंदु किन्हेकर, जिना वरारकर, वर्षा किंगरे, सुरेखा ढेंगळे, वैशाली देठे, सविता आवारी, डॉ. संजय मडावी, डॉ. इंगळे, डॉ. शशांक घोटकर, डॉ. प्रिया गाडे होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page