Ajay,Wani : रोजगार मेळाव्यात वणी विधानसभेतील तिन्ही तालुकाप्रमुखांची अनुपस्थिती व गटबाजी शिवसेना विदर्भ नेते बच्चू कडू यांनी गांभीर्याने घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या कार्यक्रमाची माहिती आणि तालुकाप्रमुखांचा अनुपस्थितीचा मुद्दा बच्चू कडू यांनी वरिष्ठ नेतृत्वापर्यंत, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत मांडल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही तालुकाप्रमुख आता बच्चू कडूंच्या थेट ‘रडार’वर असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. आगामी निवडणुकीनंतर संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचीही चर्चा असून, या तिन्ही पदाधिकाऱ्यांचे भवितव्य काय, याचे उत्तर सध्या केवळ बच्चू भाऊंच्या भूमिकेत दडले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी, शिफारशी अथवा दबावाला कितपत स्थान मिळणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर संघटनात्मक फेरबदल झालेच, तर त्याचा पहिला फटका या तिन्ही तालुकाध्यक्षांना बसणार का, याची चर्चा सध्या वणीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. “आता निर्णय बच्चू भाऊंच्या कोर्टात; पुढचा डाव काय, हे तेच ठरवणार,” अशी राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे. विशेषता यामध्ये हे दिसत आहे की बच्चुभाऊ कडूंनी वणी विधानसभेकडे विशेष लक्ष दिल्याचे समजत आहे. यावर तसेच विदर्भ शिवसेने नेते म्हणून वनी विधानसभेकडे जास्त लक्ष देत सर्व पदाधिकाऱ्यांच्या हालचालीकडे लक्ष देण्याची विशेष सूचना देखील देण्यात आली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. एक विशेष माहिती समोर देखील आलेली आहे की, या सर्वांच्या “मागे कोणी गेम खेळला” आणि “कोण थांबवत होता “हे देखील वरिष्ठांकडे माहिती पोहोचलेली आहे अशीही राजकीय चर्चा आहे.

