Sunday, August 30, 2026
HomeBreakingWCL चा "त्या ठेकेदारांना" तात्काळ ब्लॅकलिस्टेड करा, कामगारांची लूट थांबवा...

WCL चा “त्या ठेकेदारांना” तात्काळ ब्लॅकलिस्टेड करा, कामगारांची लूट थांबवा…

Ajay Kandewar, Wani:- वेकोलीच्या (WCL) वणी नॉर्थ क्षेत्रात कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण सर्रास सुरू असून केंद्र सरकारच्या किमान वेतन नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केला आहे. कंत्राटदारांकडून कामगारांना धमकावून पगाराची रक्कम रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात परत घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले असून, या प्रकरणी क्षेत्रीय महाप्रबंधकांना निवेदन देत ८ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वणी नॉर्थ एरियातील अनेक कंत्राटदार कागदोपत्री कामगारांना पूर्ण वेतन दिल्याचे दाखवतात; मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून ठराविक रक्कम परत घेतली जाते. काही ठिकाणी दबाव टाकून ‘आम्हाला पूर्ण वेतन मिळाले आहे’ असे सांगणारे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आधुनिक गुलामगिरीसारखा असल्याचे मनसेने म्हटले असून, वेकोलीतील कामगार अधिकारी व संबंधित विभागांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

“वेकोली प्रशासनाच्या नाकाखाली कामगारांची लूट सुरू आहे. दोषी कंत्राटदारांवर ८ दिवसांत कारवाई झाली नाही तर मनसे आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, आणि त्यानंतरची जबाबदारी प्रशासनाची असेल,” असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य महाप्रबंधक (नागपूर) आणि कामगार आयुक्तांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देताना मनसेचे विलन बोदाडकर, सुरज काकडे, धीरज बगवा, प्रवीण मांडवकर, सुरज लोंढे, गजानन बोन्डे आणि अमोल जेऊरकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page