अजय कंडेवार, वणी : जिल्हा पोलीस दलात दर महिन्याला होणाऱ्या क्राईम मीटिंगच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांचा गौरव करण्यात येतो. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत पाच हेडखाली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांना क्रमांक व उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रमाणपत्र दिले जाते. मागील अनेक महिन्यांपासून हा उपक्रम पोलिस दलासाठी “बुस्टर डोज” चे काम करते. यातून पोलिसांना काम करण्यास हुरूप येते. 
माहे जानेवारी २०२५ मध्ये पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याच्या DB व स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने एका मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून उल्लेखनीय यश मिळवले. अप. क्र. ७३५/२०२५ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३१०(२), ३३१(६), ३०९(६), ६१(अ) प्रमाणे नोंद असलेल्या गुन्ह्यात सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नसतानाही आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आली. आरोपीकडून १२ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत या गुन्ह्यात १०० टक्के डिटेक्शन साध्य करण्यात आले असून, ही कामगिरी निश्चितच प्रशंसनीय आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ता. ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते वणी पोलीस ठाण्याच्या DB व LCB पथकास “बेस्ट डिटेक्शन” करिता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी ठाणेदार P.I. गोपाल उंबरकर, LCB P.I. सतीश चवरे, API दत्ता पेंडकर, PSI धनराज हाके, DB प्रमुख PSI धीरज गुल्हाने,PSI सुदाम असोरे यांच्यासह सुधीर पांडे,सुनील खंडागळे,सुधीर पिदुरकर,निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख,नरेश राऊत, सतीश फुके,श्याम राठोड,मुनेश्वर खंडरे,गणेश मेश्राम,नंदू पूपलवार, गजानन कुलमेथे, छाया उमरे या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले असून, वणी पोलिसांच्या या कामगिरीमुळे जनसामान्यांत पोलीस दलाची विश्वासार्ह प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

