Wednesday, April 15, 2026
HomeBreaking NewsWani पोलीस अलर्ट, 24 तासांत मुद्देमाल Recover....!

Wani पोलीस अलर्ट, 24 तासांत मुद्देमाल Recover….!

•गुप्तधनाची बतावणी करून फसवणूक प्रकरण.

Ajay Kandewar,Wani:- घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तीन भामट्यांनी 2 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याची घटना 16 मार्च रोजी उघडकीस आली आहे.

तुझा घरातील गुप्तधन काढून देतो, असे खोटे सांगून फिर्यादी विजय ….. याच्याकडून 1 तोळे सोन्याची नेकलेस व पूजा सामग्रीकरीता नगद 1 लाख 65 हजार भामट्यांनी घेतलें असा एकूण 2 लाख 65 हजारांचा मुद्देमाल होता. परंतु काहीं दिवसांनी भामट्यानी आणखी 10 लाख रुपयाची मागणी केली. यावरून फिर्यादीला कुठेतरी फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच, विजयने वणी पोलीसात धाव घेत आपबिती सांगितली. त्यावरून फिर्यादीने वणी पोलीसांना सहकार्य मागितले व गुप्तधन काढणाऱ्या त्या भामट्यांना वणी येथे बोलाविले. सापळा रचून असलेल्या वणी पोलिसांनी कृष्णा कन्हैया हेदानी (30),जीतेन्द्र जीवन राठोड (28),सुशील राजेश द्विवेदी (36) रा तारशी पोस्ट बोरखेडी तालुका जि नागपूर हे तिघेही राहणार बुटीबोरी .एका ईनोवा MH-44-B-0055 या चारचाकी वाहनाने आलें.तेव्हढ्यातच पोलिसांनी शिताफीने भामट्याना अटक केली.आरोपीतांकडून तपासात नगदी 1 लाख 50 हजार रू तसेच सोन्याचा नेकलेस वजन कि.अं 90 हजार रूपये आणि एक टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी क. MH-B-0055 7 लाख रू.असा एकूण 9 लाख 40 हजार रू.असा मुद्देमाल जप्त करुन वणी पोलिसांत याप्रकरणी बी.एन.एस कलम अंतर्गत 318 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिघांना पोलिसांनी विचारपूस करताच आरोपींनी मुद्देमाल बाबत माहिती दिली असता वणी पोलिसांनी वेळ वाया न घालता वणी ठाणेदार P.I गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे प्रमुख यांना सूचना देत मुद्देमाल रिकव्हरी करीता टीम रवाना झाली.या प्रकरणाचे चक्रे फिरवीत मुद्देमाल डी. बी पथकाचे अवघ्या 24 तासाचा आत 9 लाख 40 हजार रु मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी न्यायालय वणी येथे हजर करण्यात आल्याने तिन्ही आरोपीना न्यायालय वणी यांनी एक दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर कारवाई वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या सूचनेनुसार डी. बी पथकाचे प्रमुख PSI धीरज गुल्हांने व चमूने केली.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page