Ajay Kandewar,Wani : गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकु येत आहे .रविवारी (दि.16) वणी ठाणेदार P.I गोपाल उंबरकर यांच्या डीबी पथकाने केलेल्या कारवाईत हे उघड झाले आहे. रविवारी वणी पोलिसांनी गुप्तधन शोधणाऱ्या टोळीतील तीन जणांना ताब्यात घेतले. सदर गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय आहे.या टोळीमार्फत विविध प्रकाराने गुप्त धन शोधून दिले जात असल्याचे दावे केले जातात यामुळे अनेक नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकतात. या टोळीद्वारे कजली करणे, पायाळू माणसामार्फत शोध घेणे, बळी देणे, पांढरे घुबड वा २०-२१ नखे असलेल्या कासवांच्या माध्यमातून गुप्तधन शोधून दिले जात असल्याचा दावा हे भामटे करीत होते.
अशाच, एका “भामट्या टोळीला” रविवारी वणी पोलिसांनी पीआय गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाने ताब्यात घेतले. तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो’, अशी बतावणी करत एका कुटुंबातील व्यक्तींची तब्बल 2 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई शहरातील वाघदरा परिसरात साय.5.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. शहरातील दीपक चौपाटीतील एका दर्गाह जवळ बुटीबोरी येथून इनोवा या वाहनाने तीन जण आले; पण वणी पोलिसांना पाहताच ते घाबरले व त्यांनी पळ काढत असल्याचं लक्षात येताच डिबी पथकांनी रचलेल्या सापळ्यात हे तीन आरोपीं अडकले व वणी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर सविस्तर माहिती घेत असताना पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी पळपळ फुटू लागले .या प्रकरणी मिळलेल्या माहिती अशी की, गुप्तधन काढून देतो, असे खोटे सांगून फिर्यादी यांच्याकडून 1 तोळे सोने व नगद 1 लाख 65 हजार घेतलें असा एकूण 2 लाख 65 हजारांचा मुद्देमाल होता परंतु आणखी काहीं दिवसांनी आणखी 10 लाख रु मागणी केली. यावरून फिर्यादीला आपली कुठेतरी फसवणूक झालेली लक्षात येताच, वणी पोलिसांत धाव घेतली व आपबिती सांगितली. त्यावरून त्या भामट्यांना फिर्यादीने वणी येथे बोलाविले व वणी पोलिसांनी सापळा रचून त्या तीन भामट्यांना जाळ्यात अडकविले.म्हणतात ना,” कानून के लंबे हाथो से कोई बच नहीं सकता.” असेच या तींघावर वणी पोलिसांत याप्रकरणी बी.एन.एस कलम अंतर्गत 318 (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या सूचनेनुसार डी. बी पथकाचे प्रमुख PSI धीरज गुल्हांने व चमूने केली.पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

