Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय नीलकंठ देरकर यांनी उर्दू शाळा, वणी येथे मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांची सहाचरणी किरण देरकर यांनी वेगाव येथे जाऊन मतदान केले. वणीकर यंदा परिवर्तन घडवतील असा विश्वास संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.वणी मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून एकूण 12 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन संजय देरकर यांनी केले आहे.
राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.