अजय कंडेवार,वणी:- वणी यवतमाळ मार्गावर 28 एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार खून प्रकरणी तपास अधिकारी वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्यासह वरिष्ठ Dysp गणेश किंद्रे यांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध 7 पथके तयार करण्यात आलेली आहे . घटनेच्या मागे सर्व अँगलतून पोलीस तपास कसून करीत आहे.
यवतमाळ मार्गावर पळसोनी फाटा जवळ योगेश ट्रेडर्स यांचे गोदाम आहे. या गोदामात जीवन झाडे हा रखवालदार म्हणून कामावर होता. 28 एप्रिल रोजी रात्रीचा सुमारास अज्ञातानी खाटेवर झोपलेल्या स्थितीत असलेल्या जीवन झाडे ला एका वस्तुने डोक्यावर वार करुन त्याचा खून केला असे प्रथमदर्शी लक्षात आले.यानंतर 29 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली होती. घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली पोलिसांनी पुढील चौकशीसाठी तेथील CCTV च्या DVR ताब्यात घेतले.परंतु कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग बंद असल्याचे लक्षात आले त्यामुळ या तपासात वेगवेगळ्या पद्धतीचा तर्क वितर्क लावणे देखील पोलिसांकडून सुरू आहे. परंतु म्हणतात ना की, “कानुन के हाथ लंबे होते है, खुनी कही से भी बच नहीं पायेगा ” असे या लावलेल्या 7 पथकांचा तपासातून मागील 6 दिवसापासून दिसून येत आहे.पोलिस आपल्या वेगवेगळ्या शैलीचा वापर करून कसून शोध घेत आहेत. हा खून की बनावट याबाबही शंकेने तपास समोर सुरुच आहे. सुगावा लागण्यासाठी वाटेल अहोरात्र सात पथके प्रयत्न करीत आहे. यात L.CB,DB, काही गुप्तचर पोलिस् तर मुखबिरांचा वापर करून वणी Dysp गणेश कींद्रे व P.I अनिल बेहेरानी यांचा चाणाक्ष बुद्धीचा वापर करून विविध अँगलने तपास सुरू आहे. कोणीही शांत बसलेले नाहीं कारण वणी पासुन तर मारेगावपर्यंत एकही पोलिस कर्मचारी असा नसेल जो या कार्यात सहभागी नसेल त्यांचा प्रयत्नाला यश नक्की मिळणार यात तीळ मात्र शंका नाहीच. परंतु क्लिष्ट पद्धतीचा गुन्हा असल्याने हा सोडविण्यात जरा वेळ जात असला तरीही “पुलिस के हाथ लम्बे होतें है…..” हे सिद्ध होणार हे त्रिकालबाधीत सत्य.
पोलिसांचे नागरीकांना आवाहन………
“पोलिस आपले कार्य करीत आहे.प्रत्येक क्षणा क्षणाची माहिती (Reporting )कर्मचारी देत आहे. आम्ही या गुन्ह्याचा छडा लावण्याकरीता विविध 7 पथके तयार केलीत. ते आप आपले कार्य अतिशय बारकाईने करीत आहे. याबाबतीत जरा ही सुगावा लागला की लवकर हा केस सोलव्ह होईल. लवकर यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागणार आहे. तरीही काही ठिकाणी पोलिस पोहचू शकत नाहीं.म्हणुन जवळपासचा परिसरातील नागरिकांनाही काही संशय वाटत असेल तर त्यांनीही वणी पोलिसांना सहकार्य करावे. माहिती सांगणाऱ्याची गोपनीयता बाळगली जाईल. याचीही खात्री पोलीस विभागाकडून देत आहों ” – (उपविभागीय पोलिस अधिकारी) गणेश किंद्रे.
…………………………………………
“नागरिकांना याबाबत काही संशयीत माहिती असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे (70201 67663) माहिती गुप्त ठेवण्यात येईल”- (वणी ठाणेदार) P.I अनिल बेहरानी यांनी आवाहन केलें.