Sunday, April 19, 2026
Homeवणीपक्ष म्हणजे माझ्या परिवार आहे याला उद्ध्वस्त करणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळविल्याशिवाय राहणार...

पक्ष म्हणजे माझ्या परिवार आहे याला उद्ध्वस्त करणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळविल्याशिवाय राहणार नाही- माजी आ.नांदेकर 

•वणी विधानसभेत नांदेकर आणि देरकर यांचे मतभेद चव्हाट्यावर.

अजय कंडेवार Wani:- वणी विधानसभा मतदार संघामध्ये “भगवा सप्ताह” हा कार्यक्रम सुरू आहे. परंतु संघामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड यांना देरकर यांनी हाताशी धरून पुर्णतः गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 6ऑगस्ट रोजी वणी शहरातील टागौर चौक मध्ये देरकर यांनी शाखा फलकाचे अनावरण केले. त्यामध्ये दोन्ही उपजिल्हा प्रमुखांचे नाव नाहीत. तसेच शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, यांच्या नेमणुका करण्याच्या अधिकार फक्त तालुका प्रमुख शहर प्रमुख व जिल्हाप्रमुख यांनाच आहे. तो अधिकार देरकरांना नाही. असा प्रश्न वणी विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की,जे पदाधिकारी अकार्यक्षम होते त्यांना त्यांच्या संमतीने आधीच पदावरून दुर सारले आहे. यात महिला आघाडीच्या संघटीका व त्यांचे पती हे सुद्धा आहे. मात्र, अजुनही काही लोकं हे आपल्या नावासमोर देरकर व जिल्हा संपर्क प्रमुखांच्या म्हणण्यानुसार पद लावतात असा भामटेगीरीचा प्रकार सुरू आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या तीस वर्षांपासून आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, मात्र देरकर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात सक्रिय झाले. ते विद्यमान पदाधिकारी यांना विश्वासात न घेता शाखा असतानाही नवीन शाखा दाखवत आहे. हे पक्षहीतावह नाही. व त्यांना मान्यता सुध्दा देता येणार नाही. दिसते ते बोललं पाहिजेत, मी स्पष्ट बोलणारा आहे. पक्ष म्हणजे परिवार आहे आणि परिवारास उध्वस्त करण्याचं काम कोणी करित असेल तर अश्या पध्दतीच्या लोकांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी ओळखुन आहे दिसते ते बोललं पाहिजेत, मी स्पष्ट बोलणारा आहे. पक्ष म्हणजे परिवार आहे आणि परिवारास उध्वस्त करण्याचं काम कोणी करित असेल तर अश्या पध्दतीच्या लोकांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी ओळखुन आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे धुळीस मिळविल्याशिवाय राहणार नाही. असे पत्रपरिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना विश्वास नांदेकर म्हणाले आहे.

यावेळी पत्रपरिषदेत वणी विधासभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर, जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, महिला जिल्हा संघटिका योगिता मोहोड, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख शरद ठाकरे, चंद्रकांत घूग्गुल, संजय आवारी, सीमा विशाल आवारी, सुरेखा भोयर, वनिता काळे, सुधीर थेरे, संजय बीजगुणवार, अभय चौधरी, भाग्यश्री वैद्य, महेश चौधरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page