अजय कंडेवार,वणी:- महिलांमध्ये आढळून येणारे कॅन्सरचे प्रमाण बघता नागरी सह.पत संस्था महिला काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल कॅन्सर इन्टीट्यूट नागपूर त्यांचे सहकार्याने परिसरातील पिडीत महिलांसाठी “मोफत स्तन कॅन्सर”तपासणी शिबिराचे आयोजन ता.१३ ऑगस्ट मंगळवार ला सकाळी ११ ते ५ च्या सुमारास वणी येथील”शेतकरी मंदिर” येथे करण्यात आले आहे.
महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या स्तनातील गाठ या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे स्तनांशी निगडीत महिलांना त्रास जाणवत असेल तर त्यांनी तात्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे करण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे,काँग्रेसच्या जिल्हा महिलाध्यक्षा संध्या बोबडे, सुरेखा लोंडे , शामाताई तोटावार ,माया गाडगे , देवकाबाई येनगंटीवार आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी मेघश्याम तांबेकर ,प्रमोद वासेकर ,आशिष मोहितकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
•शिबिरात स्री-रोग तज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार…..
“या कॅन्सर इन्स्टीट्युटचा मोठ्या संख्येने तज्ञ डॉक्टर याठिकाणी उपलब्ध झाले असून अनेक जटील शस्रक्रिया देखील या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये पार पडलेल्या आहेत. अद्ययावत आणि अत्याधुनिक साधनसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खर्चिक समजल्या जाणाऱ्या अनेक शस्रक्रिया होत असते. या शिबिरात स्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पॅप स्मीयर टेस्ट व स्तनांची सोनोग्राफी म्हणजेच मॅमोग्राफी केली जाणार आहे.”