Tuesday, February 17, 2026
HomeBreaking NewsT.H.O साहेब ,खरच तुमचं तालुक्यात लक्ष आहे का हो......?

T.H.O साहेब ,खरच तुमचं तालुक्यात लक्ष आहे का हो……?

•त्या एका कारवाईनंतर "आरोग्य समिती" पुन्हा गाढ झोपेत. • बोगस डॉक्टर निर्धास्त.

Ajay Kandewar,Wani:- गावोगावी बोगस डॉक्टर व अनधिकृत दवाखान्यांचे थैमान सुरूच आहे. जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेली तालुकास्तरीय आरोग्य समिती मात्र एका कारवाईनंतर पुन्हा “गाढ झोपेत” गेल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. याच मुख्य कारण म्हणजे तालुक्यामध्ये काय चाललंय काय नाही याची विशेष दखल घेण्यासाठी तालुका अधिकारी नेमला जातो पण तालुका आरोग्य अधिकारी हे वरिष्ठांना माहिती देण्याऐवजी फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहे की, गाव फिरून  प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन गाव समस्या जाणून घेण्यासाठी आहे असा सवाल जनतेकडून उपस्थित होत आहे. हे बेधडक बोगस डॉक्टरांना ना T.h.o ची ना स्थानिक M.O भीती आहे म्हणून हे बोगस डॉक्टर सुस्साट झाल्याचे चित्र तालुक्यात आहे. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी पत्र दिले त्यातही काहीतरी एक कारवाई केली त्यानंतर त्या मनसे आता ऍक्शन मोड मध्ये येणार असल्याच चित्र स्पष्ट आहे.

कायर येथील 8 ऑगस्ट रोजी पहिली कारवाई झाली.त्यावेळी समितीने ढोलताशा वाजवत मोठा म्हणजेच आम्ही कारवाई केली बा..असा गाजावाजा केला. त्यानंतर त्यांचा फाईलवर सारवासारव करून मोठमोठ्या घोषणा केल्या हे सगळं रंगून गेलं. पण एवढ्या गदारोळानंतर पुढे प्रत्यक्ष कारवाईचा वेग मात्र शून्यावर आला.बोगस डॉक्टर पुन्हा निर्धास्त झाले, बोर्ड पुन्हा लावले गेले, औषधांची बेकायदेशीर विक्री सुरू झाली; आणि समिती मात्र फाईलांमध्ये गुंग राहिली.दरम्यान, नागरिकांनी वारंवार तक्रारी व निवेदनं दिली तरी त्यावर कसलीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे जनता थेट सवाल करत आहे – “समिती खरी कारवाई करण्यासाठी आहे का, की फक्त गाजावाजासाठी?”

जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत…

जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत असून, लोकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, जर समितीला कारवाई करायची ताकद नसेल, तर अशा समित्या ठेवून जनतेचा वेळ, पैसा व विश्वास वाया घालवण्यापेक्षा त्यांना बरखास्त करावं. खरी गरज आहे ती ठोस कारवाईची, बोगस डॉक्टरांचे दवाखाने कायमचे बंद करण्याची. पण तालुकास्तरीय आरोग्य समिती पुन्हा गाढ झोपेत गेल्याने जनतेच्या आरोग्याची अवस्था मात्र अधांतरीच आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments