Wani:- वणी ने कोरपणा मार्गावरील बस बंद असल्यामुळे त्या रोडवर असणाऱ्या गावातील नागरिक विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे या मार्गांवरील विद्यार्थ्यांना शिरपूर व वणी येथे शिक्षणा करिता यावे लागते. मात्र एक महिना होऊनही बस सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने काही गावातील नागरिकांनी शिवसेना माजी आमदार व चंद्रपूर यवतमाळ जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांच्याकडे धाव घेतली. त्या नागरिकांनी आपली व्यथा नांदेकर यांच्याकडे मांडली असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ बस स्थानक गाठले व अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर बस सुरू करण्यास सांगितले.

मात्र चर्चा करत असताना डेपो मॅनेजर यांनी सांगितले की बांधकाम विभागाच्या चुकीच्या पत्रामुळे आम्ही एक दिवस बस चालू केली मात्र रस्ता खराब असल्यामुळे आम्ही ती बस तात्काळ बंद केली असल्याची यावेळेस डेपो मॅनेजर यांनी शिवसेना माजी आमदार व चंद्रपूर यवतमाळ जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांना सांगितले .सध्या परिस्थितीत वणी शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे अशातच ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे या प्रकरामुळे शहरात मलेरिया व डेंग्यू सारख्या रोगाची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी नगरपरिषद ने या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीन शहरात फिरवून नागरिकांना होणाऱ्या मलेरिया सारख्या रोगापासून दूर कसे राहता येईल याबाबत जनजागृती अभियान नगरपालिके तर्फे राबविण्यात यावे तसेच शहरात होणाऱ्या पाणीटंचाई बाबत लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्यात यावा या सर्व संबंधित विषयावर लवकरात लवकर मार्ग काढून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दूर करावे तसेच शहरात बऱ्याचश्या ठिकाणी रात्री च्या वेळी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे मुख्य रस्त्यावर जनावरे बसून असतात त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांचे मोठे अपघात झाले आहे तसेच शहरात चोरी चे प्रमाण अधिक वाढले आहे ते लवकरात लवकर मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट सुरू करून करावे असे निवेदन शिवसेना माजी आमदार व चंद्रपूर यवतमाळ जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांनी मुख्याधिकारी वणी यांना दिले
निवेदन देतेवेळी उमेश वैरागडे, शिवराज पेचे, प्रसाद ठाकरे, हिमांशु बोहरा, रोहीत बुरांडे, अय्यान खान, साई अंदलवार, संदीप वाघमारे, विक्की चवणे, राहुल पारखी, कपील कुंटलवार, विक्की भटगरे, हरीओम गेडाम, संकेत ठाकरे, शिवराम चिडे, मनोज लोये, मंगेश खाडे, लहानु सालूरकर, विजय गेडाम, नितीन वैद्य, रोहण पारखी, महेश चौधरी, राजु खामनकर, हरीश देऊळकर हे उपस्थित होते

