अजय कंडेवार,वणी :- वणी उपविभागात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच आता आणखी एकाने विषाचा घोट घेतल्याची घटना तालुक्यातील कायर येथे दि.2 ऑगस्ट ला सायंकाळीं घडली.
शंकर रामभाऊ कावडे (58) कायर, ता.वणी, जि यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. मृतक शंकर हा रोजमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. 2 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शंकरने राहत्या घरीच विषारी औषध घेतलें आणि त्याची स्थिती अतिशय बिकट झाली. त्यानंतर लगेच त्याला शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालय येथे शवविश्चेदन करण्याकरिता मृतदेह शवागार गृहात ठेवण्यात आले. शंकर ने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.त्याचा पाठीमागे पत्नी व 2 मुली व 1 मुलगा असा आप्त परिवार आहे.