अजय कंडेवार,वणी:- शिंदोला रस्त्याचे काम तातडीने सुरू करून विद्यार्थ्यांचें हाल बेहाल लक्षात घेऊन कोमात असलेल्या PWD विभागाने रस्ता दुरुस्त करुन बससेवा वणी ते शिंदोला तिथून शिंदोला माईन्स पर्यन्त सुरू व्हावी अशा मागणीचे निवेदन माजी जि प सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले.
शिंदोला ते शेवाळा हा रस्ता जडवाहतूकीने खराब झाला असल्याने बस वणी ते शिंदोला पर्यंत येते. परिणाम विद्यार्थ्यांना ती बसवणी ते पाणी पाऊसात सकाळी व सायंकाळी शिंदोलावरून माईन्स पर्यंत पायी जावे लागते. कधी शिंदोला वेळेवर न पोहचल्यास शाळा आणि शिक्षण बुडते.उपविभागात विविध गावे येतात दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या अडचणी आहे. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. या मार्गाला वेकोलिचा शाप असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग ठणठणीत करावा, अशी मागणी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. प्रशासनाच्या नरमाईच्या भूमिकेने प्रशासन निष्ठूर बनले आहे. हा मार्ग अवजड वाहतुकीमुळे वारंवार फुटत असल्याने दुरूस्तीचे काम तात्काळ करावे, कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम दिसुन येत आहे.
त्यामुळे विद्यार्थांनी माजी जि प सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देत मागणी केली आहे. यावेळी सरपंच हेमंत गौरकार, प्रणाली चंद्रकांत हंसकर,जया नामदेव गुरुकार,निर्मला संजय माहुरे,वंशिका गणपत सोयाम,सोनाली विजय कामरे, पल्लवी दौलत टेकाम,साक्षी संजय पंडिले,प्रियांशू अनिल उपरे,आदर्श बैलन टेकाम व येनक, येणाडी, चिखली सरपंच आदींचा सह्या आहेत.