अजय कंडेवार,Wani:- ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. वणी तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली असून, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमूळे राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडल्याचे दिसत आहे. आता त्या दोन M.O नंतर तेथील “एक स्वयंघोषित सुपरवायझर” कर्मचाऱ्याचा आता भोंगळ “विदर्भ न्युज “समोर आणणार आहे.
राजूर हे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे आणि आजूबाजूला ते गावांचा परिसर आहे.गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा कारभार म्हणजे ‘रोजचे मडे त्याला कोण रडे’ असा झाला असून सिव्हील आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.सध्या अवेळी पाऊस पडत असल्याने वातावरण बदल निर्माण झाला असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. परंतु या शासकीय आरोग्य केंद्राचा “एका कर्मचाऱ्याचा” भोंगळ कामामुळे व “भोंगळ नियोजनाने” गावातील रुग्णांतून नाराजीचा सूर निघत आहे.
“त्या..”कर्मचाऱ्याचे ढिसाळ नियोजनामुळे.
“तो कर्मचारी” 24 तास सेवा देण्याची बनावट” नौटंकी “करीत असल्याचे स्पष्ट उघड झाले आहे. त्यांचा ढिसाळ नियोजनामुळे राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे “तीन- तेरा”वाजले आहे. त्यांचा मस्टर वर देखील फुल्ल प्रेजेंटी पाहून “विदर्भ न्युज “ प्रतिनीधी देखिल थक्क झाले कारण”तो “कर्मचारी P.H.C त केवळ काहीं दिवस येतो अन् हजेरी मस्टर वर मात्र “फुल्ल”उपस्थिती हा भोंगळ जेंव्हा “विदर्भ न्युज” ला लक्षात आले ,तेव्हा पुरावे जमा करणे सुरू केलें. तेव्हा ही धक्कादायक बाब ही आता समोर आली . आधीच आरोग्य केंद्रात रिक्त पदाचे ग्रहण आणि त्यातही यंत्रणा रामभरोसे परंतु “या कर्मचाऱ्याने तर वेगळीच शक्कल लढविली“मीच कारभारी, मेरा कोण क्या बिगाडेगा” म्हणत आपलीं“पोळी शेकून” घेण्याचे कामं करीत असल्याचे चित्र दिसत आहे . विशेषतः या कर्मचाऱ्याला शासनाचे वेगळे आदेश आहे का?या कर्मचाऱ्याला मुख्यालय राहण्याचे आदेश नाही का? या विषयासंदर्भात आता “विदर्भ न्यूज”पोस्टमर्टम नक्कीच करणार यात काही शंका नाहीं