अजय कंडेवार,वणी : पोलिस अधिकारी आसिफ राजा यांची 7 फेब्रुवारी रोजी घुग्गुस ठाण्यातून बल्लारपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. त्यानंतर API प्रशांत साखरे यांच्याकडे घुग्घुस पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. आसिफ राजा यांची बदली होऊन 20 दिवस उलटूनही घुग्घुस पोलीस ठाण्याचा प्रभारावर होता.अखेर P.I श्याम सोनटक्के यांच्याकडे घुग्घुस पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांनी काल गुरुवारी उशिरा रात्री पदभार स्वीकारला.
घुग्घुस पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील पोलीस ठाणे मानले जाते. येथील औद्योगिक आणि राजकीय घडामोडींवर अनेक प्रकारच्या चळवळींचा प्रभाव पडतो. जिल्ह्याची औद्योगिक नगरी समजल्या जाणाऱ्या घुग्घुसचे नूतन पोलीस ठाण्याचे अधिकारी श्याम सोनटक्के यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील वाहतूक विभाग,वणी ,आर्णी आणि नागपूर पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. आणि यवतमाळ जिल्ह्यातील यशस्वी ठाणेदार म्हणून विशेष छाप सोडली होती.