Wednesday, October 14, 2026
HomeBreaking NewsLCB चे ‘ऑपरेशन सर्च’ Success....

LCB चे ‘ऑपरेशन सर्च’ Success….

•तीन बालकांची सुटका,आरोपीचा मुसक्या आवळल्या.

Ajay Kandewar,Wani:-अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणात अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश करत तिन्ही बालकांची सुखरूप सुटका केली आहे. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलांच्या शोधासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन सर्च’ सुरू केले होते. अखेर या कारवाईला यश मिळाले असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

यवतमाळ शहरातील मोरगाव पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, काही अज्ञात इसमांनी बालकांना फुस लावून अपहरण केले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्चा वळवला.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणघाट (जि. वर्धा) येथे छापा टाकला आणिआरोपी देविदास अंगादास वावरे वय ४४ रा. शिवाजी पुतळा जवळ पांढरकवडा ह. मु. किनगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा. यास किनगांव येथुन ताब्यात घेत तीनही बालकांची सुखरूप सुटका केली. या कामगिरीत LCB टीमने जबरदस्त चातुर्य व तत्परता दाखवली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीनी बालकांना परराज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने नेले होते. मात्र पोलिसांनी वेळ न घालवता गुप्त सापळा रचून त्यांचे कारस्थान हाणून पाडले.या यशस्वी कारवाईबद्दल जिल्ह्यातील पोलिस दलात समाधानाचे वातावरण असून, “LCB चे ऑपरेशन सर्च” हे एक उदाहरणीय मिशन ठरले आहे.

या मोहिमेत यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, वणी उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. यवतमाळ पो.नि. सतिष चवरे,सपोनि दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, सुनिल खंडागळे,सुधिर पांडे,निलेश निमकर, सलमान शेख,रजनिकांत मडावी, नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे पोलीस स्टेशन मारेगाव हे करीत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page