Vidharbh News -अजय कंडेवार,वणी : “देश वाचवा, संविधान वाचवा व लोकशाही वाचवा” ही मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गांभीर्याने घेत असून संपूर्ण देशभर जनतेमध्ये जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी प्रचार अभियान राबवित आहेत. त्या अनुषंगाने चंद्रपूर – वणी – आर्णी ह्या लोकसभा मतदार संघात पक्षाचे कार्यकर्ते तन, मन, धनाने प्रचारात सामील झाले आहेत.
भाजपचे जनविरोधी, देशविरोधी, लोकशाही व संविधान विरोधी कावा समजून घेऊन जनतेने भाजपचा डाव उधळून लावावा व आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीचा उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन माकप आपल्या बैठका व प्रचार मोहिमेतून करीत आहेत
माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके व किसान सभेचे नेते कॉ. मनोज काळे यांनी कायर व परसोडा येथे जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली.