अजय कंडेवार,वणी:- वणी विधानसभेत लोकसभा निवडणुकीनिमित्त विविध पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी हे प्रचारास बाहेर निघालेले नाही. ते सुध्दा आपल्या राजकीय पक्ष व उमेदवाराकडुन निवडणूक रोख्यांची अपेक्षा बाळगुन होते.अनेक उमेदवारांकडुन या रोख्यांची योग्य व्यवस्था करण्यातही आल्या असल्याचीही चर्चा देखील आहे. उमेदवारांची प्रचार यंत्रणा राबविण्यास ते संधीसाधु नेते, पदाधिकारी खूप उत्साह दाखवित आहे. १९ एप्रिल रोजी चंद्रपुर-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. जाहिर प्रचारही सुरु झाला आहे. काँग्रेस आणि भाजप उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मात्र, यावेळी अनेक निष्ठावान तथा महत्वाचे नेते, कार्यकर्ते पाच वर्षानंतर ॲक्टिवही झाले आहे.Deposed leaders, office bearers “Active” after 5 years in elections in Chandrapur Loksabha.
निवडणुकीनिमित्त राजकीय पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आपआपल्या उमेदवाराचा प्रचार आपल्या परिने करतांना दिसुन येत आहे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने जे पदभ्रष्ट नेते, पदाधिकारी पुढे, पुढे करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनाच जरा जास्तच निवडणूक रोख्यांची चिंता सतावत आहे. निवडणुकीतील आर्थिक व्यवहार आपल्याकडेच राहावे म्हणून काही पदभ्रष्ट नेते, कार्यकर्त्यांनी थोडीफार खर्चाची इन्वेस्टमेंन्ट केल्याचेही चर्चा आहे. गेली तिन, चार वर्ष नागरिकांना व आपल्याच पक्षातील सामान्य कार्यकर्त्याची आर्थिक फसवणूक करणारे, रस्त्यात भेटले तरी न विचारणारे आज गावात येऊन “क्या बोलते ” कैसा है..निकले गी क्या सीट विचारत फिरत आहे. विशेष पदभ्रष्ट पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने 5 वर्षानंतर सक्रीय झाल्याने त्या पक्षाचे सामान्य कार्यकर्ते उमेदवाराच्या प्रचारापासून दुराऊ लागल्याचे दिसु लागले आहे. ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत सुध्दा सांभाळत येत नाही. स्वतःला युवा नेते म्हणुन मिरविणाऱ्या व वरिष्ठ नेते मंडळीची जिहुजेरी करणाऱ्यांची या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच चर्चा होत आहे.