अजय कंडेवार,वणी:- शहराजवळ असलेल्या निंबाळा येथे रुद्राक्ष वन उद्यान निंबाळा प्रकल्पाचे भूमीपुजन आयोजित केलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मृद व जल संधारण, मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे राहणार असून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. 7 मार्च रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.
या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहणार आहेत. त्यासोबत वेणूगोपाल रेड्डी (भा.प्र.से.) प्रधान सचिव, वने, महीप गुप्ता (भा.व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळ, किरण जगताप (भा.व.से.) उपवनसंरक्षक (प्रादे.) पांढरकवडा, वनविभाग पांढरकवडा, शैलेष टेंभुर्णीकर (भा.व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), वसंत घुले (भा.व.से.) वनसंरक्षक (प्रादे.), यवतमाळ वनवृत्त हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे विस्तारक रवी बेलूरकर यांनी केले आहे.