अजय कंडेवार,वणी : महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांची नावे जाहीर केली. यात सलग चौथ्यांदा युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी निसंकोचपणे वणी विधानसभा क्षेत्राचे तडफदार युवक अजिंक्य शेंडे यांची फेरनिवड त्याच पदावर करण्यात आली.Yuva Sena’s “Dhanya Wagh” Ajinkya Shende on the post of Upazila chief for the fourth time
वणी शहरातील उबाठा गटाचे युवासेने उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे हे तरूणांचे आयकॉन आहेत.संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्र तसेच यवतमाळ जिल्ह्यात संघटन मजबूत असून तरूणांच्या प्रश्नासाठी सातत्याने युवासेना कार्य करत आहे. तरुणांसाठी आशेचा किरण म्हणून आज (उबाठा) युवासेनेकडे पाहिले जाते. समस्या कोणतीही असो, त्या ठिकाणी युवासेनेचे युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य धावून जातात. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात या युवासेनेचे संघटन चागले मजबूत असून सातत्याने तरूणवर्ग युवासेनेत कार्य करण्यासाठी धडपडतांना दिसत आहे… युवासेना उपजिल्ह्या प्रमुख यांचे नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रात युवकांचे संघटन मजबूत करण्याकरिता मोठ्या संख्येने युवक युवासेनेत दाखलही होत आहे. अजिंक्य शेंडे यांची तडफदार युवा शिवसैनिक म्हणून त्यांचं सामाजिक व राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. याचीच पावती पक्षश्रेष्ठींनी अजिंक्य शेंडे यांना फेरनिवड त्याच पदावर करुन पुन्हा एकदा विश्वास दर्शविला.सलग चौथ्यांदा निवड झाल्याने युवासेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे
.