Ajay,वणी : आदिवासी काँग्रेसच्या संघटनात्मक विस्ताराला वेग देताना वणीतील दोन युवा कार्यकर्त्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मनोज वाकटी यांची यवतमाळ जिल्हा आदिवासी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी, तर कुंदन पेंदोर यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे वणीतील आदिवासी काँग्रेसच्या संघटनात्मक बाब समोर आली.
अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या माध्यमातून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल किनाके यांनी मनोज वाकटी यांना जिल्हा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देत संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपविली आहे. तसेच वणी तालुका आदिवासी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक नागभीडकर यांचा नेतृत्वात वसंतराव पुरके यांचा हस्ते कुंदन पेंदोर यांना शहर उपाध्यक्षपदाची नियुक्ती दिली.आगामी काळात आदिवासी समाजाच्या प्रश्नांना संघटित स्वरूप देत पक्षाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि संघटना अधिक मजबूत करण्याचे आव्हान या दोन्ही युवकांसमोर असणार आहे.

